विद्यार्थ्यांचा भक्कम पाया


 

           मराठी वाचन  करण्यासाठी उपयुक्त पुस्तके  

नमस्कार 

                आपले सर्वांचे   Shreyashi Prakashan  या वेबपेजवर स्वागत  आहे. 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे बदल झाले. ज्ञानरचनावाद, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शिक्षणाची वारी यासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 100% विद्यार्थी प्रगत करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्यातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ झाली. तरीदेखील वास्तविक 100% विद्यार्थी प्रगत होण्यासाठी अजूनही अडचणी आहेत. अशा अडचणी का येत आहेत? आपल्या अध्यापन पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे का? कितीही शिकविले तरीही 100% विद्यार्थी प्रगत होत नाहीत. असे अनेक प्रश्न शिक्षकासमोर उभे आहेत. 
काळासोबत जो चालतो आणि जो स्वत:मध्ये बदल करून घेतो, तो टिकतो, हा निसर्गाचा नियम आहे. प्रचलित शिक्षणपद्धतीत इयत्ता पहिलीच्या व वयानुरूप दाखल  विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना बरेच शिक्षक अ ते ज्ञ, व बाराखडी या पद्धतीनुसार अध्यापन करत असतात. ही पद्धत अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक यामध्ये कोठेही ही पद्धत सांगितली नाही. याचा तोटा असा होत आहे. 48 स्वर व व्यंजने शिकविणे, बाराखडी, शब्द वाचन, वाक्यवाचन यानुसार शिकविण्यासाठी खूप दिवस लागतात व मुलेही आनंददायी पद्धतीनुसार शिकत नाहीत.  राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मधील मार्गदर्शक तत्वे 1) ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडणे. 2) घोकंपट्टीतून शिक्षणाची सोडवणूक करणे. या तत्वांना या अध्यापन पद्धतीतून फाटा देण्यात येतो. पर्यायांने मूल शाळेत आनंददायी वातावरण नसल्याने वारंवार मुले गैरहजर राहतात. त्यामुळे 100% मुले प्रगत होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. 100% विद्यार्थी प्रगत करण्यासाठी काही उपक्रम मी माझ्या शाळेत राबविले त्यातील एक उपक्रम म्हणजे मराठी  वाचन-लेखन.

                                                      वाचन लेखन pdf डाऊनलोड करा.

                
खालील  दिलेली  पुस्तकामध्ये  सर्व  उपक्रम दिले  आहेत.  खालील  पुस्तकांमधून  आपल्या मुलांना  गुणवत्ता वाढ झाली नाही तर पुस्तके परत  घेतली जातील. पैसे  परत दिले  जातील.

मराठी 

                   


             किंमत  रू. ५०                               किंमत  रू. ५०                                किंमत  रू. २५ 

वरील पुस्तके आपणास  मागणी  करावयाची  असल्यास  ९३७२६२८८२० या नंबर  whatsapp करा.
आपणास  आमची  अजून साहित्य  खरेदी  करण्याचे  असल्यास खालील बटन  क्लिक  करा. 
  

महाराष्ट्रात कोठेही  साहित्य  कमीत  कमी  १ दिवसांत  व  जास्तीत जास्त  ६ दिवसांत  पोहोच केले  जाईल 

   
आजच  संपर्क करा. 
श्रेयशी प्रकाशन 
 मो. 9373628820 









टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने